पत्नीने लाईव्ह लोकेशन शेअर करून प्रियकराकडून केली नवऱ्याची हत्या…
हैदराबादः आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये पत्नीने व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडून, आपल्या निरागस मुलीसमोरच आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. या खळबळजनक घटनेमागील कट जाणून पोलीसही थक्क झाले. मृत रमेश (२३) एका खासगी कंपनीत काम करत होता. रमेशने दोन वर्षांपूर्वी १९ वर्षीय हसिनीशी लग्न केले होते आणि त्यांना एक लहान मुलगी आहे. मात्र, हसिनीचे तिच्या पतीवर प्रेम नव्हते. […]
अधिक वाचा...पुणे! चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; घटनेची पुनरावृत्ती…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ एका चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले. कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे […]
अधिक वाचा...मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…
ठाणे : गडचिरोलीतील आश्रम शाळेतील घटनेचे पडसाद अद्यापही उमटत असताना शहापूरमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी याला बेड्या ठोकल्या आहेत. आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये […]
अधिक वाचा...खवड्या डोंगर प्रकरण! कुणाल याने आयफोनसाठी पाऊल उचललेच नाही; बहिणीने सांगितले…
छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरली काका यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवर कुणालच्या मावस बहिणीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुणालच्या बहिणीने स्पष्ट केले की, कुणाल याने पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचलल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्याच्याकडे स्वतःचा आयफोन 15 […]
अधिक वाचा...अडीच लाखांचे दागिने चोरून कामगार पसार…
पुणे : मालकाची नजर चुकवून सराफीच्या दुकानातून सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मूर्ती चोरून कामगार फरार झाला आहे. दाखल गुन्ह्यात फरासखाना पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत मालकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेतील सोन्या मारूती चौकात मेसर्स चिमणलाल बभूतमल अॅण्ड कंपनी नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान […]
अधिक वाचा...शिरूरमध्ये धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत घरावर आदळला…
शिरूरः शिरूरहून राजगुरुनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. अपघात घडताच घाबरलेल्या ट्रकचालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि पळून गेला. चालकविरहित ट्रक ताबा नसल्यामुळे सरळ एका स्थानिक नागरिकाच्या घरावर जाऊन आदळला. अवघ्या काही क्षणांत घडलेल्य या विचित्र घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले, की […]
अधिक वाचा...सांगलीत किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं…
सांगलीः कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे., सांगलीजवळील कुपवाडमध्ये ही घटना घडली. अत्यंत किरकोळ कारणांवरून झालेल्या या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी, कुपवाडमध्ये शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पती-पत्नीवर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मनीषा केसरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. […]
अधिक वाचा...अमरावतीतील रुग्णालयाच्या आगीत होरपळून ३ अर्भकांचा मृत्यू…
अमरावती: अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर, रुग्णालयाची नियमित अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) होत होती आणि या वर्षीच्या तपासणीसाठीही अर्ज केला होता, अशी माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात अतिदक्षता विभागात पहाटे सव्वा तीन च्या सुमारास आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरमधून ठिणगी पडून ही […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…
पुणेः शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर, पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पतीने खरोखरच स्वत:वर गोळी झाडून घेतली का, याबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे या घटनेचा खोलवर तपास चालू आहे,. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका […]
अधिक वाचा...वैजापूरमधील मिठाईच्या दुकानातून आणलेल्या कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या…
छत्रपती संभाजीनगरः जिल्ह्यातील वैजापूर शहरातील एका मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये, डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशाप्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. मात्र, घरी जाऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. खरेदी केलेल्या […]
अधिक वाचा...
