पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ३५ गुन्हेगारास हद्दपार केले आहे.
पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गैरकायद्याच्या मंडळीत सहभाग असणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन खालील नमुद ०५ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे
(१) अनिल महादेव चांदणे वय ४० वर्षे, रा. गल्ली नं. ५२, राजु टेलर शेजारी, तळजाई वसाहत, पुणे
(२) हर्षद राजेंद्र देशमुख, वय २५ वर्षे, रा. चाळ नं.३/ ७ १२, दत्त मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे.
भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे अनुक्रमे
(१) शुभम दिपक ऊर्फ नथ्थु भोरेकर, वय २६ वर्षे, रा. काळुबाई मंदिरामागे, गायमुख जवळ, आंबेगाव बु।।, पुणे
(२) दत्ता राहुल कदम, वय २२ वर्षे, रा. साई मंदिरा शेजारी, प्रथमेश व्हिला, तिसरा मजला, जैन मंदिराजवळ, आंबेगाव खु ।।, पुणे
(३) किरण परशुराम भंडारे वय २० वर्षे, रा. अभिनव कॉलेज मागे, फिरंगाई माता मंदिरा जवळ, केअर ऑफ हनुमंत बेलदरे, आंबेगाव बु।।, पुणे यांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ ०२ कडून आजपावेतो एकूण ३५ आरोपींना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे हद्दपार करण्यात आलेले आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविण पाटील, अपर पोलिस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…