मंदार किवळे प्रकरण! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली संपूर्ण माहिती…

पुणे : पुणे शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंदार किवळे (वय 35) याच्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे.

मंदार किवळेचा तीन दिवसांपूर्वी त्यांची बेल झाली आणि जमानत झाल्यानंतर तो बाहेर आला, बाहेर आल्यानंतर कोर्टाच्या कामकाजानिमित्त तो शिवाजीनगर कोर्टात आला होता, त्यावेळी ही घटना घडली. आरोपींच्या विचारपूस आणि चौकशीत दोन दिवसात कट रचला असे समोर आलं, जेव्हा आरोपींना कळलं की मंदार किवळेची कोर्टाची तारीख आहे, तो कोर्ट परिसरात जाणार आहे, आणि तो बेल वरती बाहेर आल्यानंतर कुठे आहे त्याची कल्पना आरोपींना नव्हती, पण कोर्टाची तारीख आहे त्यामुळे तो कोर्टात जाणार असल्याची माहिती आरोपींना खात्रीशीर मिळाल्याने त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी हा कट त्यांनी रचला, आणि ही घटना घडवून आणली आहे, अशा प्रकारची माहिती आत्तापर्यंतच्या तपासात दिसून आलेली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

ज्यांनी सुपारी दिली होती, त्यांनी काही पैसे ठरले होते, त्यापैकी काही पैसे दिले होते, त्याच पैशातून आरोपींनी काही हत्यारे घेतली, अशी माहिती समोर आली आहे. सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतर संपूर्ण, सखोल तपास होईल, त्यांना कोठडी देण्यात आली आहे, यामध्ये तपासात आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती देखील पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संबंधित घटना अत्यंत गंभीर अशी आहे, कोर्टाच्या समोर रस्त्यावर ही घटना घडली आहे, परंतु एका घटनेने पूर्ण शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे किती योग्य आहे ते लोकांनी स्वतः विचार करायला पाहिजे. अशी फायरिंगची घटना बहुतेक सहा महिन्यानंतर ही घटना घडलेली आहे, मागच्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड आपण पाहिला तर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडलेला नाही. कोयत्याचे प्रकरण असतील किंवा फायरिंगचे प्रकरण असतील याची पूर्णपणे परिस्थिती सुधारलेली होती, थांबलेली होती, ही गंभीर घटना होती परंतु ही घटना घडल्यानंतर पोलिसांच्या रिस्पॉन्स पण कसा होता याचीही लोकांना त्याची जाणीव व्हायला पाहिजे. ही घटना घडल्याबरोबरच तिथे असलेले पोलीस यांनी जखमीला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले, अर्ध्या तासाच्या आतमध्येच त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली, त्या ट्रीटमेंटमुळे आज आम्हाला ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टर कडून मिळालेले प्रतिसाद आहे त्यावरून वाटते की जखमीचा जीव वाचतो आहे, तात्काळ जखमीवर उपचार आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याच बरोबर आमचे वेगवेगळे पथक आरोपीच्या शोध मोहिमेत लावण्यात आले होते, एक ते दीड तासाच्या आतमध्ये तीन आरोपी पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेण्यात आले आणि त्याचबरोबर दौंडच्या दिशेने पळून जात असताना आमच्या टीमने साडेचार वाजताच्या सुमारास म्हणाले अंदाजे तीन ते साडेतीन तासांमध्ये घटनेतील जे आरोपी होते, त्यांना ताब्यात घेतले आहे अशा प्रकारचं रिस्पॉन्स पण पोलिसांनी दिलेला आहे पाहणे गरजेचे आहे, असेही अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या घटनेमध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची पावले उचललेली आहेत. एकंदरीत शहराची कायदा व सुव्यवस्था याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की, पूर्ण आलेखाच्या आधारावर जे स्ट्रीट क्राईम्स आहेत, किंवा इतर कोणतेही प्रकार असतील, कोयते किंवा इतर शस्त्र वापरण्याचे प्रकार असतील किंवा मर्डरचे प्रकार असतील ते कमी झालेले आहेत, ही गंभीर घटना नक्कीच मोठी आहे, परंतु एक अशी घटना घडल्यामुळे पूर्ण शहराला आणि शहरातील पोलीस दलावर टीका करणे योग्य नाही असं आमचं मत आहे. घटना घडली त्या अनुषंगाने पूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी, राऊंड अॅप आणि इतर मोहीम आणखी जोराने सुरू करण्यात आलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे, लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, आपण नक्कीच गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न करू आणि हे मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलीस दल मोठ्या मेहनतीने करत असल्याचेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

अमितेश कुमार म्हणाले, ‘न्यायालय परिसराला आणखी कशाप्रकारे सुरक्षित करता येईल, याची तपासणी झाली, एन्ट्री गेट आणि आत मध्ये सोडताना काय करता येईल, पार्किंगचे व्यवस्था कुठे ठेवता येईल, सुरक्षा आणखी परिणामकारक कशी करता येईल, कडक सुरक्षा कशी करता येईल, सीसीटीव्ही पूर्ण परिसरात कशी लावता येईल, आजूबाजूचे रस्ते आणि परिसरातील अतिक्रमण कशाप्रकारे काढता येईल, बाहेरच्या लोकांना एंट्री नाही त्यांना कसा थांबवता येईल, त्यांच्या पार्किंगचे व्यवस्था कशी करता येईल, या सर्व विषयांवर चर्चा झालेली आहे, त्या अनुषंगाने आज परत एकदा फॉलोअप बैठक इतर पोलीस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी ऑफिसर आणि बारचे मेंबर यांची संयुक्तपणे पाहणी झाली आहे, याची डिटेल एसओपी करण्यात येणार आहे.’

पुणे! ससून रुग्णालयातून मंदार किवळे याचा जबाब; सगळं सांगितलं, दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला…

पुणे! मंदार किवळे रक्तबंबाळ होऊन चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे शब्द अन् आरोपींची नावे समोर…

पुण्यातील मंदार किवळे प्रकरण! मृतदेहावरच घेतली होती हत्येचा बदला घेण्याची शपथ…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला का मारलं…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!