Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…

कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…

कराची: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये आज (रविवार) जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात झालेल्या बॉम्बस्फोटात ३५ ठार तर 50 हून अधिक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. यावेळी रॅलीत […]

अधिक वाचा...

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

अलवर (राजस्थान): पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हिने धर्म परिवर्तन केले असून, फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लाह याच्यासोबत लग्न गेले आहे. पाकिस्तानमधून तिने पहिला पती अरविंद याला फोन करून शिवीगाळ केली आहे. पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजूने पाकिस्तानातून फोन करून आपला पूर्वीचा पती अरविंद याला धमकावण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या […]

अधिक वाचा...

पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…

जयपूर (राजस्थान): जयपूर विमानतळावरून पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवती आणि तिच्यासोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पाकिस्तानी सीमा हैदर भारतात पळून आली आणि तिने भारतीय सचिनसोबत लग्न केलं. त्यानंतर भारतीय अंजू पाकिस्तानात पळून गेली आणि तिने तिथे प्रियकर नसरुल्लासोबत लग्न केले. सीमा आणि […]

अधिक वाचा...

अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…

कराची (पाकिस्तान): भारतीय महिला अंजू हिने धर्मांतर केल्यानंतर नसरुल्लाह याच्याशी निकाह केला आहे. तिचा निकाहनामा व्हायरल झाल्यामुळे या दोघांच्या प्रेम कहाणीची भारत आणि पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन मुलांना सोडून अंजू पाकिस्तानात गेली. त्यानंतर तिने नसरुल्लाहशी निकाह केला आहे. आता या प्रकरणात अंजू आणि नसरुल्लाहकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. नसरुल्लाहने तर अंजूची भारतात […]

अधिक वाचा...

Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

नवी दिल्ली: राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने इस्लाम धर्म स्विकारत पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केल आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंजू हिने आपण प्रियकराला फक्त भेटायला आलो आहोत आणि नंतर भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. पण, अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने स्वतःचं नाव आता […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

जयपूर (राजस्थान): भारतीय महिला अंजू ही तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पोहचली असून, तिने हा प्रवास वाघा बॉर्डर पार करून केला आहे. अंजू पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर अंजूचे वडील प्रसाद थॉमस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. प्रसाद थॉमस म्हणाले, ‘मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले […]

अधिक वाचा...

अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…

कराची: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (वय ३४) पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. पाकिस्तानमधून तिने एक संदेश धाडला असून, प्रसारमाध्यमांनाही विनंती केली आहे. पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अंजू हिची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजूने देशाची […]

अधिक वाचा...

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

नवी दिल्लीः पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर हिची देशभरात चर्चा सुरू असतानाच एका भारतातील एक महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. अंजू हिचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

नवी दिल्ली: पाकिस्तानातून पळून नेपाळ मार्गे बेकायदेशीर रित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना थेट त्यांनाच प्रश्न विचारला आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न तिने विचारला आहे. सीमा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!