नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत […]
अधिक वाचा...नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून…
नाशिकः नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका बापाने रागाच्या भरात आपल्या 9 वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुमित पुजारी असे बापाचे नाव आहे. या घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले […]
अधिक वाचा...मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…
नाशिक: तडीपार सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (वय 27, रा. शहा, सिन्नर, नाशिक) याची गावातीलच 14 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला […]
अधिक वाचा...बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू…
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पायल राजेंद्र चव्हाण (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे. पायल चव्हाण हिच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे. नाशिक-कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉललगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल […]
अधिक वाचा...वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) दिनकर फकीरराव कदम हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात काम करत आहेत. लहानपणापासून वर्दीचे आकर्षण असल्यामुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि अधिकारी झाले. पोलिस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. एखाद्या दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करणारा, नकारात्मामधून सकारात्मक विचार करणारा आणि वेळेचे बंधन पाळणारा अधिकारी म्हणून त्यांची […]
अधिक वाचा...वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) तृप्ती सोनवणे या गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना आई-वडिलांच्या इच्छेखातर पोलिस दलात आल्या आणि राज्यभर गाजलेले डॉ. संतोष पोळ हत्याकांडाचा उत्कृष्टपणे तपास केला. शिवाय, अनेक गुन्हे उघड केले आहेत. एका आवाजानेच आरोपी घाबरत असून, पोलिस दलात डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. संदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण […]
अधिक वाचा...नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…
नाशिकः पत्नीच्या ब्रेन ट्युमरसह आजारापणाला कंटाळून निवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या प्रकरणात उपनगर पोलिसांनी मृत पतीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा नोंदवून स्वतः आत्महत्या केल्याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पती-पत्नीवर त्यांची मुले व कुटुंबाच्या हजेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी आता समोर आली आहे. […]
अधिक वाचा...नाशिक! पत्नीला सर्वलोकी पाठवलं आता तिच्यासोबत जातोय…
नाशिक: नाशिकच्या जेल रोड परिसरातील गंगापूर भागात राहात असलेल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास करत आहेत. मुरलीधर जोशी असे आत्महत्या करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे. पत्नीच्या दीर्घ आजाराच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं […]
अधिक वाचा...नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग…
नाशिक : नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात एका युवकाने बस स्थानकावर स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने हॅप्पी होली म्हणत संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शुभम जगताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत विजय गेहलोत हे […]
अधिक वाचा...
