सोलापूर! टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू…
सोलापूर : मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागला आहे. मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी गावाजवळील ही अपघाताची घटना घडली. अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे. बापाविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र ही चौथी मुलगी असल्याने कृष्णा राठोड […]
अधिक वाचा...लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…
लातूर : पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औराद शाहजनी या गावात घडली. इम्रान बेलुरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन […]
अधिक वाचा...खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…
चित्रदुर्ग (कर्नाटक): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात असताना विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. […]
अधिक वाचा...कोल्हापूर! आराम बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा अन् 12 तासांत सात आरोपी जेरबंद…
कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 12 तासाच्या आत जेरबंद केले असून, चोरलेला 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री 12 वाजता […]
अधिक वाचा...संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप निश्चित…
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज (मंगळवार) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना धक्क बसला असून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष […]
अधिक वाचा...विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; रॅगिंगचा प्रकार…
सोलापूर: बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसिक बनसोडे असे या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने दिलेल्या माहितीनुसार, ‘चार […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…
पुणे : पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ सहायक पोलिस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. गोपनीय चौकशीत प्रवीण घाडगे यांनी […]
अधिक वाचा...पुणे! नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची कडक नियमावली, उल्लंघन केल्यास थेट…
पुणे : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, उल्लंघन केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह असतो. 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हॉटेल्स, पब, लॉज, फार्महाऊस तसेच […]
अधिक वाचा...पुणे! आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ Video समोर; प्लिज, असं करू नका…
पुणे: गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या टोळीने आयुष कोमकरची गोळ्या घालून हत्या केली होती. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने हा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरसह एकूण १२ ते १३ जणांना […]
अधिक वाचा...
