हनीट्रॅपमध्ये अडकवून कल्याणच्या नागरिकाला ब्लॅकमेल; १७ लाख रुपये उकळले; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीला (वय ५६), त्याचा एक आक्षेपार्ह व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन, एका पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांनी १७.६५ लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार (एफआयआर), कल्याण येथे राहणाऱ्या आणि एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडित व्यक्तीला एका २८ वर्षीय महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि त्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केला. तिने तिच्या साथीदारांसह, त्या क्लिपचा वापर करून गेल्या तीन महिन्यांत तक्रारदाराकडून १७.६५ लाख रुपये उकळले आहेत.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२) (खंडणी) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात, पोलिसांनी मुख्य आरोपी डोंबिवलीची रहिवासी सीमा जगताप, तिची आई भारती शाम ठाकूर (वय ५५), तिचा पती सुमित सिंग आणि एका अज्ञात पोलीस हवालदारासह इतर तिघांची नावे जाहीर केली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!