
सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…
सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून कारवाईची भीती दाखवत वाहनचालकांकडून पैसे देखील उकळत होते. वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेला हा प्रकार गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत चार पुरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आली असून दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा तब्बल 21 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
View this post on Instagram
पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत असून अटकेतील आरोपींचा अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का, त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पंढरीच्या वारीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात पालखी कालावधीत कायदा व सुव्यवस्थेसाठी 97 गुन्हेगारांना तडीपार (जिल्हा बंदी) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात आली आहे.
जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…
पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…
सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…
सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

