
पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा होर्मुझच्या समुद्रात धक्कादायक शेवट; शेवटचा फोन…
पुणे: होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. पुण्याचे सुपुत्र आणि जहाजावरील अभियंता हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अखेर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण करमरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेरंब हे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ घरापासून दूर, अथांग समुद्रावर आपले कर्तव्य बजावत होते. त्यांचा समुद्री प्रवास संपत आला होता आणि काहीच दिवसांत ते सुट्टीवर पुण्यात परतणार होते. रविवारी रात्री २ वाजून ५० मिनिटांनी हेरंब यांनी भारतात आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधला होता. नेहमीप्रामाणे खुशाली विचारून फोन ठेवला. मात्र, या फोननंतर अवघ्या ४० मिनिटांत, म्हणजेच पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या ‘गॅलक्सी’ नौकेवर काळाने घाला घातला आणि हेरंब यांचा मृत्यू झाला. हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करुन हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी दिली. ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, होमुर्झच्या समुद्रधुनीमध्ये नौकेवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर थेट इंजिनच्या मुख्य विभागात भीषण आग लागली. जहाजावर एकूण २४ कर्मचारी होते, ज्यातील ११ जण भारतीय होते. ओमानच्या नौदलाने अत्यंत शिताफीने बचावकार्य राबवत २४ पैकी २३ कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र, यामध्ये केवळ हेरंब करमरकर नव्हते. हेरंब बेपत्ता झाल्यापासून त्यांचे कुटुंब आणि मित्र देवाकडे प्रार्थना करत होते की, ते सुखरूप असावेत. मात्र, मंगळवारी त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आणि सगळ्यांच्याच आशा संपल्या.
हेरंब यांचे निकटवर्तीय ऋषी टंडन म्हणाले, काही दिवसांतच डोळे भरून ज्या लेकाला पाहायचे होते, त्याचे आता केवळ पार्थिवच घरी परतणार या विचाराने वृद्ध आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश थांबत नाहीये. पुण्याचा हा उमदा अभियंता आता केवळ आठवणींच्या रूपात मागे उरला आहे.
Live Video सुरु असतानाच झाडल्या गोळ्या; इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू…
बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…

