
धक्कादायक! महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत गुप्तांगात टाकले लाल तिखट अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या सासरकडील मंडळींनी अमानुषपणे मारहाण केली. शिवाय, तिच्या गुप्तांगात लाल तिखट टाकले आणि गरम लोखंडी रॉडने शरीराला चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील करनवास पोलीस स्टेशन हद्दीत 13 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. ‘सासरकडील लोकांनी मला विवस्त्र करून मारहाण केली. माझ्या गुप्तांगात लाल तिखट टाकले आणि तापलेल्या लोखंडी रॉडने शरीराला चटके दिले,’ असा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेनी सांगितले की, ‘मी घरात अभ्यास करत होते. त्यावेळी रोहित रूहेला नावाचा तरुण नेब्युलायझर मागण्याच्या बहाण्याने घरी आला. मी मशीन आणण्यासाठी घरात गेले असता, तो रूममध्ये घुसला त्याने लाईट बंद केले आणि मला जमिनीवर पाडून माझा विनयभंग करू लागला. मी त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझी जाऊ आली आणि तिने दरवाजा वाजवला. त्यामुळे रोहित तेथून पळून गेला. पण त्यामुळे परिस्थिती अजून बिघडली. जावेने सासू आणि सासऱ्यांना बोलवले आणि मी चारित्र्यहीन असल्याचे सांगितले. त्यानंतर सासरकडील लोकांनी मला रात्रभर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पती घरी आला असता, त्याने देखील पत्नीला मारहाण करत कुटुंबाची अब्रु गेल्याचा आरोप केला. सासऱ्याने विवस्त्र केलं आणि गुप्तांगात लाल तिखट टाकलं. लोखंडाचा रॉड गरम करून त्याने चटके दिले. मी तडफडत होते. पण सासरकडील लोकांनी माझ्यावर दया दाखवली नाही.’
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला गुणा येथील गोपीसागर धरणाजवळ फेकून दिले गेले. तिथून जात असलेल्या एका युवकाने महिलेला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि तिच्या माहेरकडील लोकांना याबाबत माहिती दिली. माहेरचे लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेला रूग्णालयात भरती केले. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून करनवास पोलिसांनी सासू, सासरा, पती, जाऊ आणि रोहित रूहेलाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेतील अनेक कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सर्व आरोपी फरार आहेत. लवकरच आरोपींना अटक करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…
धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…
धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…
धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…

