पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…

पुणे : पुणे पोलिस दलामधील एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) घडली आहे. भारत दत्ता आस्मर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खडक पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस चौकीच्यावर असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिसांने स्वत:ला संपवले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

भारत दत्ता आस्मर हे गुरुवारी (ता. ४) रात्री खडक पोलिस ठाण्यात कामावर होते. ते रोज प्रमाणे ड्यूटीला गेले. पोलिस चौकीत कोणी नसल्याचे पाहून त्यांनी आराम खोलीत जावून त्यांनी रेस्टरुमची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर त्यांनी कार्बाइनच्या साह्याने स्वत:वर चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे. ते काही वर्षांपूर्वी पोलिस दलात दाखल झाले होते. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

आस्मर यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. भारत दत्ता आस्मर यांनी आत्महत्या का केली? कौटुंबिक वाद होते की वेगळं काही कारण होतं?,याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. भारत दत्ता आस्मर गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते. गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी ते पोलिस दलात दाखल झाले होते.

पुणे येथील खडक पोलिस ठाण्यात भारत आस्मर हे पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलिस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वर असणाऱ्या खोलीत आरामासाठी गेले. परंतु अचानक काय झाले त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांच्या आत्महत्या वाढत आहेत…
पोलिस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत ज्यात पोलिसांना राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे लागते. दबावात त्यांना कधीकधी त्यांच्या कर्तव्याशी आणि त्यांच्या सन्मानाशी तडजोड करावी लागते. काही पोलिसांना हे सहन होत नाही आणि ते नोकरी सोडतात किंवा अशी टोकाची पावले उचलतात. अनेक घटनांमध्ये असे दिसून आले आहे की, पोलिस कर्मचारी तक्रार करतात की त्यांना खूप दबावाखाली काम करावे लागते. 24 तासांत केव्हाही ड्युटीवर हजर राहणे. सण-उत्सवात रजा नाही, प्रोत्साहनाचा अभाव. पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे शोषण हे देखील यातील एक कारण असू शकते.

पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…

पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…

पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!