
पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…
पुणे : बीएएमएस झालेल्या मुलीला एमडी होण्यासाठी वडिलांनी कर्ज काढून पैसे दिले होते. एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तिघांनी १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
तळवडे आणि पिंपरी येथे जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. युवतीला (वय २६) पिंपरीतील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असं सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. युवतीचे बीएएमएस पूर्ण झाले आहे. एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा तिला संशयित भास्कर राव याने आपण महाविद्यालयात व्यवस्थापनात काम करत असल्याचे सांगितले. व्यवस्थापन कोट्यातून पिंपरी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. पुढे तिच्याकडे पैशांचीही मागणी केली. वडिलांनी कर्ज काढून संशयित विशाल पवार, भास्कर राव आणि कूलभूषण कांबळे या युवकांना १९ लाख ७५ हजार रुपये दिले. पैसे दिले तरी प्रवेशाचे काम होत नसल्याने युवतीने त्यांच्या मागे तगादा लावला.
संशयितांकडून होत असणारी टाळाटाळ वाढल्याने शेवटी फिर्यादी युवतीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिथेही संशयितांनी पैसे देऊ असे लेखी स्वरुपात मान्य केले. त्यानंतर तिला धनादेशही दिले. पण ते धनादेश वटले नाहीत. पुन्हा युवतीने पोलिसात तक्रार केल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. युवतीकडून संशयितांनी पैसे घेतले पण प्रवेश मिळवून न देता फसवणूक केल्याने तिच्यासह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…
महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

