Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

पुणे: लोणी काळभोर परिसारत गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दिनेश भिकाराम गोरा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे 2 अशा चौघांवर प्रथम खबरी अहवालाची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही युवकांनी गोरा यांना तीन हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी (ता. १०) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 जणांचा घोळका हा वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात आला. यावेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नसून तुम्ही काहीतरी कमी करुन घ्या असे म्हणाले. यावेळी यातील एकाने त्याच्या कानाखाली मारली. पाठीमागे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करुन दमदाटी केली. तसेच पुन्हा दुकानात घुसून मारहाण केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडळाच्या कार्यकर्त्यांना तिथून पिटाळून लावले आणि हा वाद शांत झाला. दिनेश गोरा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली असून चौघांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!