
सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करून, जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत पवनानगर येथील एका खाजगी घरामध्ये व पोल्ट्री फॉर्ममधे अशा दोन ठिकाणी तीन पत्ती नावाचा पत्यांचा जुगार अड्डा चालु आहे. त्यावरून सहा पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी 25/12/2023 रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पवनानागर येथे 1)दुर्गा माता मंदिराचे शेजारी एका बंद पत्र्याचे शेडमध्ये व 2) एम्पायर हॉटेलचे पाठीमागे, काले गावच्या हद्दीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये असे दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण 15 जण हे तीन पत्ती पत्यांचा जुगार खेळताना मिळून आले.
सदरच्या कारवाईत रोख रक्कम व अन्य मुद्देमाल असा एकूण 7,05,000/- (अक्षरी रुपये सात लाख पाच हजार रू.) किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा/सचिन गायकवाड, पोकॉ रईस मुलानी, सिद्धेश वाघमारे व लोणावळा ग्रामीण स्टेशन कडील पोलिस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…
लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…
लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

