जवानाला घरातून बाहेर पडताच पोलिसांनी अडवून गाडी तपासली अन्…

पाटणा (बिहार): लष्करातून सुट्टीवर आलेल्या जवानाची मोटार पोलिसांनी तपासणी आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे. बेगुसराय पोलिसांनी जवानाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. राज किशोर कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. तो मटिहानी पोलीस स्टेशन हद्दीतील खोरमपूर चकोर येथील रहिवासी आहे.

जवानाकडून डिटोनेटर स्फोटकांचे 75 नग आणि 90 स्फोटकं असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत. पोलिसांना रात्री उशिरा माहिती मिळाली की, एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात स्फोटकं घेऊन कारमधून जात आहे. लोहियानगर ओव्हर ब्रीजजवळ पोलिसांनी आरोपीच्या कारला घेराव घातला. मात्र पोलिसांना पाहताच दोघं पळून गेले. तर, राजकिशोर सिंहला पोलिसांनी पकडले आहे.

पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली. अटक करण्यात आलेला राज किशोर कुमार दीड वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता. एसपी मनीष यांनी सांगितले की, ‘एका युवकाला संशयाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर घरं पाडण्यासाठी आणि भूसुरुंग लावण्यासाठी केला जातो. आरोपी मणिपूरमध्ये लष्करात लिपिक म्हणून कार्यरत आहे.’

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!