दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना कापूसवडगाव (ता. वैजापूर) येथे ही घटना घडली आहे. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकर थोरात (वय 36), दिनकर माणिकराव थोरात (वय 60), रंजना दिनकर थोरात (वय 50) असे आरोपींची नावे आहेत.

मृत महिला भारती संतोष थोरात यांचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांनी वैजापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, बहीण भारतीचे 12 वर्षापुर्वी कापुसवाडगाव येथील संतोष दिनकर थोरात सोबत लग्न झाले होते. तसेच लग्नाच्या वेळी भारतीच्या वडीलांनी दिडलाख रुपये हुंडा व अंगावर दागदागिने दिलेले होते. सोबतच, संसारपयोगी सर्व वस्तु दिल्या होत्या. भारती सासरी नांदण्यास आल्यानंतर तिला सुरुवातीचे सहा महिने चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी पती व सासरचे लोक संगनमत करुन वेगवेगळ्या कारणावरुन भांडण करू लगले. तसेच, नेहमी तुझ्या बापाने आम्हाला काही दिले नाही. तु तुझ्या माहेराहून पैसे घेवुन ये अशी मागणी करु लागले. भारती यांनी याबाबत आई-वडीलांना सांगितले. त्यामुळे, भारती यांच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना समजावुन सांगितले की, लग्नाच्या वेळी भरपुर खर्च झाला आहे. आम्ही तुम्हाला लग्नावेळी आमच्या आयपतीप्रमाणे मानपान केलेला आहे. आता आमच्याकडे पैसे नाही. आम्ही तुम्हाला पैसे देवु शकत नाही.’

भारती यांच्या आई-वडिलांनी समजावून सांगून देखील सासरचे लोक छोट्या छोट्या कारणावरुन त्यांना मानसिक व शारीरीक त्रास देत होते. तसेच, सुमारे पाच महिन्यांपुर्वी भारती खुप आजारी असल्याचे तिने भावाला फोन करुन सांगितले. त्यावेळी तिच्या सासरचे तिला दवाखान्यात घेवुन गेले नव्हते. तसेच, तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्यामुळे भारतीच्या भावाने तिच्या गावाकडे जावून तिला दवाखान्यात नेवून औषधोपचार केले होते, असे ज्ञानेश्वर कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली अन् चौकात सोडून पळाला…

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!