पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…

पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरात पोटच्या 40 दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री केली, पण अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. येरवडा पोलिसांनी या बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

आरोपींमध्ये बाळाची आई मिनल ओंकार सपकाळ (वय 30), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (वय 29), एजंट साहिल अफजल बागवान (वय 27), रेश्मा शंकर पानसरे (वय 34), सचिन रामा अवताडे (वय 44) आणि ग्राहक महिला दीपाली विकास फटांगरे (वय 32) यांचा समावेश आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

अवघ्या दीड महिन्याच्या नवजात बाळाचा 3.5 लाखांसाठी सौदा केल्याचा प्रकार बुधवारी (ता. 2) रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान घडला होता. आर्थिक विवंचनेतून बाळाच्या आई वडिलांनी बाळाची एका एजंटला विक्री केली. गुन्हा 4 जुलैला येरवडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आई वडील व एजंट आणि बाळ खरेदी करणाऱ्या एकूण 6 जणांना अटक केली आहे. मुंबईत एका उच्चभ्रू वस्तीत नवजात बाळाला सोडून इंग्रजीत चिठ्ठी लिहित आर्थिक विवंचनेतून सोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील येरवडा भागातून ही घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ दांपत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. घरात आर्थिक चणचण असल्याने त्यांनी मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. एजंटच्या माध्यमातून दीपाली फटांगरे या महिलेला कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न करता ही मुलगी साडेतीन लाख रुपयांमध्ये विकली गेली. या व्यवहारात एजंटने दीड लाख रुपयांचे कमिशन स्वतःकडे ठेवून आई-वडिलांना फक्त दोन लाख रुपये दिले. काही दिवसांनी आई-वडिलांना खरी रक्कम कळताच त्यांना आपलीच फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि बाळ विक्रीच्या या धक्कादायक व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

पुणे! तलाठी अन् युवतीच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…

पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!