डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नी विरोध करत असल्यामुळे डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे. महिलेच्या शरीरावर आणि डोक्यावर 12 जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बिथरी चैनपूरमधल्या बालीपूर अहमदपूर इथे राहणाऱ्या सीमाचे वडील महेंद्रसिंह यांनी सहा एप्रिल रोजी इज्जतनगर पोलीस ठाण्यात तिचा पती अखिलेश आणि त्याचा भाऊ संजू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले, की 2017 साली सीमा हिचे अखिलेश सोबत लग्न लावून दिले होते. हुंड्यासाठी तो तिला त्रास द्यायचा. त्यातूनच त्याने 29 मार्चला रात्री उशिरा सीमाची मारहाण करून हत्या केली.

पोलिस निरीक्षख जयशंकर सिंह यांनी सांगितले, आरोपी अखिलेशने कबूल केले की त्याने कंपाउंडर विजेंद्र याच्यासह मिळून हत्येचा कट रचला. त्यानुसार 29 मार्चला रात्री कंपाउंडर अखिलेशच्या घरी राहिला. रात्री सीमा घरात फिरत असताना तिला किचनमध्ये नेऊन फरशीवर पाडण्यात आले. त्यानंतर चाकू आणि खलबत्त्याने डोक्यावर पाठीमागून वार करण्यात आला. त्यामुळे रक्तस्राव होऊ लागला. विजेंद्रने डंबेलच्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. त्यामुळे सीमाचा मृत्यू झाला. सीमाचा मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि तो घेऊन आरोपी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे ती मृत असल्याचे घोषित झाल्यावर आरोपी कंपाउंडरसह चाचा हरिप्रसाद, चुलत भाऊ संजू आणि अन्य नातेवाईकांसह जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेला. तिथेही ती मृत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीने विजेंद्रला पुरावे नष्ट करण्यास घरी पाठवले. त्याने रक्ताचे डाग बऱ्यापैकी पुसून काढले; मात्र शेजारचे आवाज ऐकून तो घाबरला आणि चाकू आणि खलबत्ता घेऊन पळून गेला.

पोलिसांनी सांगितले, आरोपी अनेक महिलांशी चॅटिंग करत असल्याचे आणि त्याचे त्यांच्याशी संबंध असल्याचं मोबाइलवरून स्पष्ट झाले. सीमा या गोष्टीला विरोध करत असे. म्हणूनच तिची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर अशी अफवा पसरवण्यात आली, की मानसिक विकारामुळे ती पडली आणि जखमी झाली होती. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.’

नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…

पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!