सांगली हादरली! एकाच कॉलेजमधील येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या…

सांगली : बामणोली येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्यानंतर त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीच्या कुपवाड हद्दीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पालकांच्या समोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याचा खळबजानक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला होता. यानंतर प्रथमेश पाटील (वय १७, मुळ राहणार कवठेमहांकाळ तालुका, सध्या मिरज) याने ही आत्महत्या केली आहे. एकाच शाळेतील विद्यार्थ्यांनी एका मागून एक केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, विद्यार्थिनी ही अल्पवयीन आहे. कुपवाड हद्दीतील बामणोलीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजमध्ये ती 11 वीचे महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. 2 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली. तिने आपली स्कुलबॅग ही शाळेच्या बसमध्ये ठेवली. त्याच वेळी पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून विद्यार्थिनी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली. दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे 40 ते 45 फुटाच्या अंतरावरून तिने जमिनीच्या दिशेने उडी घेतली. घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

घरात झोपी गेलेली श्रेया अचानक ओरडून जागी झाली अन्…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!