
पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे. या पोलिस भरतीची सराव चाचणी ही पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे.
राज्यात मागच्यावेळी 17 हजार पदांची भरती झाली. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.’
राज्यात पुन्हा साडेसात हजार पदांसाठी पोलिस भरती; मुंबईत बाराशे पदं…
पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…
महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…
मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

