नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…

लखनौ (उत्तर प्रदेश): पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत महिलेने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना घडली आहे. शिवाय, पळून जाताना पाच लाख रुपये रोख आणि साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून शोधूनही सापडत नसल्याने सासूने फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून फरार महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे.

कानपूरमधील रामचा विवाह प्रतीक्षा तिवारी हिच्याशी झाला. मात्र, त्या प्रतीक्षाचे लग्नानंतरही जुन्या प्रियकरासोबत (मनीष) सबंध सुरुच होते. सासरी आल्यानंतर सुद्धा त्याच्याशी प्रतीक्षा चोरून फोनवरून बोलत होती. नवऱ्याने रंगेहाथ पडकल्यानंतर दोन परिवारांची पंचायत सुद्धा पार पडली. त्यामुळे त्या महिलेने आपली चूक कबूल केली होती. शिवाय, माफी माफी मागितली होती. मात्र, काही दिवसांनी पुन्हा जुन्या प्रियकराशी बोलणं सुरूच ठेवले. त्यानंतर 11 एप्रिल रोजी थेट पळून गेली. गेल्या 18 दिवसांपासून शोध सुरू असताना ती सापडलीच नाही. शेवटी 29 एप्रिल रोजी सासूने पोलीस ठाण्यामध्ये सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली.

दरम्यान, रामने समझोत्याचा व्हिडिओही बनवला होता. ज्यामध्ये प्रतिक्षा आणि तिचे वडील दिसत होते. व्हिडिओमध्ये प्रतिक्षा म्हणाली होती की, जर या घरात काही घडले तर ती जबाबदार असेल. यानंतर प्रतिक्षा घरात व्यवस्थित राहू लागली. रामने सांगितले की, प्रतिक्षा घरी आल्यानंतर तो पुण्याला परतला. तिची आई अशिक्षित आहे. त्यानंतर 11 एप्रिल रोजी प्रतिक्षा मनीषसोबत पळून गेली. जाताना तिने घरातून 5.50 लाख रुपये रोख आणि 3.38 लाख रुपयांचे दागिने सोबत नेले. मनीषविरुद्ध जसवंत नगरमध्येही फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्यासोबत पिस्तूल ठेवतो.

दक्षिण पोलिस आयुक्त महेश कुमार म्हणाले की, गुजैनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल आणि रोख रक्कम आणि दागिने जप्त केले जातील.

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!