अटक वॉरंट जारी होताच रॉबिन उथप्पा याने दिलं स्पष्टीकरण…

चेन्नईः भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पीएफ आयुक्त गोपाल रेड्डी यांनी हे वारंट जारी केले आहे. यानंतर उथप्पाने स्वत: स्पष्टीकरण जारी केले आहे.

रॉबिन उथप्पा याच्यावर प्रोव्हिडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. या वॉरंटच्या आधारे पुलकेशीनगर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उथप्पा ज्या कंपनीच्या संचालक मंडळावर काम करतो, त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेले पैसे कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केले नाहीत. ही रक्कम जवळपास २४ लाख इतकी आहे. ही बाब समोर आल्यानंतर रॉबिन उथप्पाविरोधात पीएफ आयुक्तांनी अटक वॉरंट जारी केले आहे.

उथप्पाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘पीएफ प्रकरणाबाबत अलीकडे काही बातम्या प्रसारित झाल्यानंतर, मी स्ट्रॉबेरी लॅन्सेरिया प्रायव्हेट लिमिटेड, सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बेरी फॅशन हाऊसमधील माझ्या सहभागाबाबत स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे. 2018-19 मध्ये या कंपन्यांमध्ये माझी संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. या कंपन्यांना मी कर्जाच्या स्वरूपात काही आर्थिक सहाय्य केले होते. त्यामुळे माझी संचालकपदी नियुक्ती झाली होती, मात्र माझ्याकडे सक्रिय कार्यकारी भूमिका नव्हती. शिवाय मी कंपनीच्या दैनंदिन कामाकाजाचा प्रभार सांभाळत नव्हतो. एक व्यावसायिक क्रिकेटर आणि प्रजेंटेटर म्हणून माझ्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे ज्या कंपन्यांना मी आर्थिक सहाय्य केले आहे, त्यात मी कोणतीही कार्यकारी भूमिका बजावत नाही. दुर्दैवाने मी ज्या कंपन्यांना अर्थसहाय्य दिले होते, त्या कंपन्या पैशांची परतफेड करू शकल्या नाहीत. त्यामुळे मला कायदेशीर कार्यवाही सुरू करावी लागली. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. काही वर्षांपूर्वीच मी माझ्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. पीएफ आयुक्तांकडून जारी केलेल्या नोटीसांना माझ्या कायदेशीर टीमने उत्तर दिले आहे. या कंपन्यांमध्ये माझी कोणतीही भूमिका नाही आणि मी स्वतः कंपनीशी संबंधित नाही, त्यासाठी लागणारी कागदपत्रेही द्या, पीएफ आयुक्तांकडे सादर केली आहेत.’

दरम्यान, भारताकडून दीर्घकाळ खेळणारा आणि नंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून तुफानी फलंदाजी करणारा उथप्पा सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर तो आता लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो. अलीकडेच हाँगकाँग सिक्स स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. उथप्पाने भारतासाठी 48 एकदिवसीय सामने खेळले असून 934 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 90.59 होता. उथप्पाने भारतासाठी एकूण 13 टी-20 सामने खेळले असून 249 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात एक अर्धशतक झळकावले आहे.

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

Video : विराट कोहली थेट महिला पत्रकारासोबत भिडला…

मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…

निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी…

पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!