ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

पुणे : ससून रुग्णालयामधून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला मोटारीमधून रावेतपर्यंत सोडणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दत्ता डोके असे या चालकाचं नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ललित पाटील सोमवारी (ता. 2) ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. त्यावेळी ससूनच्या बाहेर या डोकेने त्याला मदत केल्याचे समोर आले होते. डोके हा ससूनमध्ये भरती असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडे चालक म्हणून काम करत होता.

ललित पाटील रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयातून निघाल्यानंतर शेजारी असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलला पोहचला. तिथून रिक्षाने बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथे आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला. तिथून तो रावेतला पोहचला आणि तिथे त्याने दत्ता डोकेची कार सोडली आणि दुसर्‍या कारमधे बसून तो मुंबईला गेला असे पोलीसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ललित पाटील याच्या शोधासाठी पुणे पोलीसांनी दहा पथके तैनात केली आहेत.

दरम्यान, ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग्ज माफिया ललित पाटील हा पळून गेल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते आणि याच सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळत नाही तर आरामात चालत निघून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…

प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!