
पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध? वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावावर झाडल्या गोळ्या…
पुणे: पुणे शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा भडकल्याचं पहायला मिळत असून, पुण्यातील बालाजीनगर परिसरात एकावर गोळीबार करण्यात आला आहे.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणानंतर पुण्यात आंदेकर-कोमकर टोळीत सुरु झालेल्या गँगवॉरचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शुटर्सकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
आंदेकर-कोमकर टोळीतील गँगवॉरमधील हा चौथा हल्ला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी याला आंदेकर-कोमकर गँगवॉरची किनार असल्याचे पहायला मिळत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, 2025 साली पुण्यातील गणेशपेठ परिसरात बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये वनराज आंदेकर याची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता. तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतील एकेकाला संपवायला सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. हादेखील वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपीचा भाऊ होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बालाजी नगर परिसरात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकर, वनराज आंदेकरची पत्नी, उदयकांत आंदेकर यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे तिघेजण तुरुंगात आहेत. मात्र, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. तर बंडू आंदेकर हा तुरुंगात बसूनही सक्रिय आहे. बंडू आंदेकरने तुरुंगात बसून बुधवारी बालाजी नगर परिसरात आपल्या हस्तकांच्या माध्यमातून आणखी एक हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…
आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…
आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

