पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता….

मुंबई : ‘लय भारी न्यूज’चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे. ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या या अटक प्रक्रियेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

पत्रकार तुषार खरात यांनी जामीन दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरते, हे माझ्या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना तुषार खरात यांनी व्यक्त केली. माझ्या या संघर्षात एका रुपयाच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता तब्बल ३६ वकिलांनी माझ्या वकीलपत्रावर सह्या केल्या. तसेच राज्यभरातील विविध पत्रकार संघटना आणि सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी या संघर्षात मला व माझ्या कुटुंबाला भक्कम आधार दिला, त्याबददल मी या सगळ्यांचा आभारी आहे, असे खरात यांनी सांगितले.

कारागृहातून मंगळवारी बाहेर पडल्यानंतर पत्रकार तुषार खरात यांनी कराडला प्रितीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. चव्हाण हे विद्वान व विचारवंत होते. ते साहित्यिक होते. त्यामुळे समाजातील विचारवंत व विद्वान लोकांची त्यांना कदर होती. समाजातील विचारवंत, विद्वान, साहित्यिक, कलावंत, पत्रकार यांचा ते आदर करायचे. विचाराला ते महत्त्व द्यायचे. समोरच्याचे नकारात्मक विचार असले तरी ते सकारात्मकपणे घ्यायचे. ज्येष्ठ पत्रकार आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सातत्याने जहरी टीका केली होती. परंतु त्याचा राग यशवंतराव चव्हाण यांनी धरला नाही. यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य अत्रे यांच्यावर खोटी ॲट्रॉसिटी, खोटी खंडणी, खोटी विनयभंग अशा केसेस टाकल्या नाहीत. कारण यशवंतराव चव्हाण टीका करणाऱ्या लोकांनाही शत्रू समजत नव्हते. यशवंतराव चव्हाण यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारधारेचा पाया महाराष्ट्रात रुजवला. ही पुरोगामी विचारधारा, हा यशवंत विचार आता मोडीस निघत चालला आहे. परंतु ही पुरोगामी विचारधारा व यशवंत विचार जपण्याचा एक पत्रकार म्हणून आम्ही कसोशीने प्रयत्न करू. आमच्यावर खोट्या केस टाकल्या म्हणून, आम्हाला तुरुंगात टाकले म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या या विचारधारेपासून अजिबात दूर जाणार नाही. सरकारवर व सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा आमचा अधिकार आम्ही कदापी सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा तुषार खरात यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर केली. यावेळी तुषार खरात यांच्यासोबत त्यांचे वडिल आबासो खरात हे सुद्धा उपस्थित होते.

धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…

कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड…

पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये: अजित पवार

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!