पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रिक्षा चालकाने ०१ लाख १० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू मुंढवा पोलिस ठाणे येथे जमा केल्या होत्या. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक त्यांचा सत्कार केला.

मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, पुणे मुळ पत्ताः नेवासा, जि. अहमदनगर) यांना खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असतांना मुंढवा ओव्हरब्रिजवर एक लेडीज बॅग मिळून आली. त्यांनी कोणताही लोभ न करता सदरची बॅग मुंढवा पोलिस ठाणे येथे जमा केली. सदर बॅगची पाहणी करता बॅगमध्ये अॅपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर असे अंदाजे १,१०,०००/- (एक लाख दहा हजार रुपये) ऐवढ्या किंमतीचा मुद्देमाल तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कॉर्ड, गाडीचे आरसी बुक इ. महत्त्वाचे कागदपत्र मिळून आले.

सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना मिळताच त्यांनी सदर आरसी वरील आरटीओ नंबरवरुन वाहन मालकाचे नाव मोबाईल नंबर प्राप्त करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलिस फौजदार, रमेश उगले यांनी माहिती प्राप्त केली असता, ममतोष प्रकाश (रा. पटना) यांना संपर्क केला त्यांनी माझी मुलगी माही मुस्कान ही अॅमेनॉरा सिटी, पुणे येथे राहण्यास असून सदरचे वाहन मुलगी वापरत असल्याचे सांगितले. माही मुस्कान यांना मुंढवा पोलिस ठाणे येथे बोलावून घेतले, सदर लेडीज बॅगची व त्यामधील किंमती मुद्देमाल व ओळखपत्रावरुन खात्री झाल्याने सदरची बॅग माही मुस्कान यांना परत करण्यात आली. सदरची बॅग लॅपटॉप व सर्व वस्तुसह परत मिळाल्याने माही मुस्कान यांनी आनंदी होवून पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच ममतोष प्रकाश यांनी पुणे शहर पोलिस दलाचे कौतुक केले आहे.

रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे यांनी त्यांची हालाकीची व गरीबीची परिस्थिती असतांना देखील कोणताही लोभ न बाळगता सदरची हेडीज बॅग पोलिस ठाणेस जमा करुन मानुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांचे उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी दखल घेवून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपआयुक्त, आर. राजा, परिमंडळ – ५, पुणे शहर, मा. सहा. पोलिस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी सहा. पोलिस फौजदार, रमेश उगले, पोलिस अंमलदार निलेश पालवे, सचिन अडसुळ व इतर स्टाफ यांनी केली आहे.

मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…

मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…

मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…

मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!