शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ पालघर पोलिसांनी उलगडलं…

पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे.

कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. 20 जानेवारीपासून अशोक धोडी हे बेपत्ता होते. पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर शोध घेण्यात यश आले आहे. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचे अपहरण केले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं असून गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली होती.

पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच आता उघड झाला आहे. आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा असून या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत होते. अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांनाही लवकरच शोध घेऊन अटक केले जाईल, असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला आहे.

माझ्या वडिलांचा जीव गेला, त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असे सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबीयांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली. तसेच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याचे अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!