धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…

सांगली: प्रेम संबंधातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये ही घटना घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे त्यांच्याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दादासाहेब चौगुले हे बुधवारी (ता. १७) सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे, ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…

सांगली हादरली! एकाच कॉलेजमधील येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या…

सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!