
धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…
कोल्हापूर: एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या अस्मिता काटकर (वय २९) या युवतीने एक महिन्याच्या चिमुकलीला सोडून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अस्मिताच्या आई-वडिलांनी मोठे आरोप केले आहेत.
अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अस्मिता आणि प्रतीकसिंह यांचा 26 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापुरात लग्न झाले होते. सासरच्या लोकांनी खूप आग्रह करून देखील अस्मिता हिने लग्नात डान्स केला नव्हता. याच रागातून तिचा वारंवार छळ केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
शिवाय, वंशाला दिवा पाहिजे म्हणत तिच्यावर मुलगा होण्याचा दबाव होता. पण मुलगी झाल्याने सासरची माणसं नाराज होती. त्यामुळे तिला सतत टोमणे मारले जात होते. तसेच माहेरहून पैसे आणण्याचा वारंवार तगादा लावला जात होता, या सगळ्या प्रकाराला कंटाळून अस्मिताने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. आईच्या दुधावर असणाऱ्या एक महिन्याच्या चिमुकलीची ताटातूट झाली. आईच्या कुशीत विसावण्याच्या वयात आईचं छत्र हरपलं. तर वडील, आजी, आजोबा, आत्या पोलीस कोठडीत गेले. त्यामुळे एक महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी चुलत आजीवर येऊन पडली आहे. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त आहे. एवढंच नाही तर अस्मिताच्या आई वडिलांकडून सतत मोठी मागणी सुरू होती. यामुळे अस्मिताच्या आई वडिलांचे 25 लाख रूपये खर्च झाले होते.
अस्मिता हिच्या वडिलांनी लग्नात 9 तोळे सोने घातले होते. तर 5 लाखांचा संसारसेट दिला होता. पहिल्या दिवाळीत जावयाला 81 हजार 101 रुपये ऑनलाईन पाठवले होते. अधिक मासात 35 हजार रुपये आणि चांदीची भांडी दिली. डोहाळे जेवणासाठी दोन लाखांचा खर्च केला. प्रसूतीसाठी दवाखान्याचे 77 हजार भरले. त्यानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या आग्रहामुळे 52 हजार रुपयांचा पाळणा देखील घेतला होता. तरी देखील सासरच्यांची भूक संपत नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
स्मिताची आई संगीता अजित सरदेसाई (वय 50, सध्या रा. दिवा, जि. ठाणे) यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर (30), सासू मनीषा काटकर (51), सासरा वीरेंद्रसिंह काटकर (58), नणंद ऋतुजा काटकर (25) अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, मुळ ठाण्याची असलेली अस्मिता आजरा तालुक्यातील लाटगाव येथील लाडात वाढली. गोव्यात तिने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका खासगी बँकेत आणि मुंबईत एअर इंडियामध्ये नोकरी केली. कोल्हापुरातील सुशिक्षित आणि सधन घरात लग्न ठरल्यामुळे तिने नोकरी सोडली. अस्मिताने मृत्यूच्या दोन दिवसाआधी म्हणजेच शुक्रवारी रात्री माहेरी फोन केला होता. तेव्हा अस्मिताने आपल्या सासरचा निरोप आईपर्यंत पोहोचवला होता. येत्या 15 ऑगस्टला मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात बारसं करा, असे तिच्या सासरच्यांची मागणी होती. त्यासाठी तिने घरी फोन केला पण आर्थिक परिस्थिती नसल्याने बारसं पुढं ढकल असं तिच्या आईने म्हटले होते. त्यानंतर अस्मिताने जास्त काही न बोलता फोन ठेवला, असे अस्मिताचे आईशी शेवटचं बोलणं झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…
हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

