
समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत १३/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुरनं. २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. सदर गुन्हयातील चोरी झालेली ऑटोरिक्षाचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे पो.अं. हेमंत पेरणे, शरद घोरपडे व रोहीदास वाघेरे यांनी तपासले.
समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पो.अं. हेमंत पेरणे व रहीम शेख यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, चोरीला गेलेली रिक्षा एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ ही बारणे रोड मंगळवार पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेली असून त्यात दोन जण बसलेले आहेत. खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व स्टाफ वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी गेले असता, सदरची रिक्षा व दोन इसम दिसून आले. पोलिसांना पाहून दोघे जण रिक्षा सोडून पळून जावू लागले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना स्टाफच्या मदतीने पकडले. १) आलीम अल्ताफ पालकर (वय २६ वर्ष, रा. आलीम टॉवर जवळ, घर क्रं. २, गल्ली नं. ३ कोंढवा पुणे), २) अक्तर हसन शेख (वय २४ वर्ष, रा. ग्रीन पार्क, गल्ली नं. २ घर क्रं. ६०, कोंढवा, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना सोबतचे पोलिस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलिस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता, दोघांनी सदरची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ ही ऑटोरिक्षा ११२३ न्यु नाना पेठ पुणे येथून चोरल्याची कबूली दिली. अधिक तपासात अजून एम्.एच्. १२ एफ्. सी. ०३९८ ऑटोरिक्षा व एम्. एच्. १२ जे. ई २२०० दुचाकी अशी वाहने समर्थ पोलिस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे सांगितले. समर्थ पोलिस स्टेशन येथील अभिलेख तपासले असता गु.र.नं. २०७/२०२३ व २०८/२०२३ दाखल आहेत. सदरचे तिन्ही वाहने पंचनाम्याने ताब्यात घेवून सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींवर यापुर्वी चोरीचे व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, संदीप गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, पोअं. हेमंत पेरणे, शरद घोरपडे पोना. रहीम शेख, पोहवा. रोहीदास वाघेरे, प्रमोद जगताप, पोहवा. गणेश वायकर, शहाजी केकान, सपोफौ. दत्तात्रय भोसले, पोअं. अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी केली आहे.
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…
लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…