पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
पोलिस अधीकारी प्रशांत बच्छाव हे पोलिस दलात गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी पुणे शहरातील नामांकित कॉलेजमध्ये सात वर्षे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले, तर पोलिस अधिकारी म्हणून काम करताना अनेकांना न्याय मिळवून दिला आहे, देत आहेत. कॉलेज आणि पोलिस हे दोन वेगवेगळे विभाग असले, तरी दोन्ही ठिकाणी समाजपयोगी काम करून एक आदर्श समोर ठेवला आहे. त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात…

प्रशांत बच्छाव यांचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौळाणे गाव. एकत्र कुटुंबातील बालपण. वडील शिक्षक तर आई गृहिणी. कुटुंबामध्ये वडील सर्वांत मोठे असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी वडिलांवर होती. सुसंस्कृत एकत्र कुटुंबामध्ये जडणघडण झाल्यामुळे आणि शैक्षणिक वातावरणामुळे पुढे काय व्हायचे हे शिक्षण घेत असतानाच ठरवले आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल ठेवली. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर बी प्लॅन असावा असा दंडक आहे, त्यांनी तो योग्य पद्धतीने अमलात आणला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तर दुसरकडे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न साकार केले.

शिक्षण…
१ ते ४ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौळाणे (नि) व वऱ्हाणे, ता. मालेगाव, जि. नाशिक
५ ते १२वी – एस. बी. एच. विद्यालय, मालेगाव, जि. नाशिक.
एफवाय ते बीएसस्सी – महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक
एम एसस्सी – पुणे विद्यापीठ, पुणे

बारावीमध्ये असतानाच…
प्रशांत बच्छाव हे लहानपणापासूनच अभ्यासाच हुशार. दहावी, बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. बारावीमध्ये असताना मावशीच्या गावाला गेले असताना मावसभाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. मावस भावाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशांत बच्छाव हे धडाधड देत राहिले. स्पर्धा परीक्षेची तयारी न करता एवढी उत्तरे येत होती तर अभ्यास केल्यानंतर नक्कीच यशस्वी होणार, असे त्या वेळी भावाने सांगितले. मग, त्याच वेळी भविष्यात स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. खरं तर मावसभावासोबत असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली होती आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.

एकत्र कुटुंब…
एकत्र कुटुंब पद्धत हळहळू कमी होऊ लागली आहे. पण, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी एकत्र कुटुंब पाहायला मिळते. एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आहेत. विभक्त कुटुंबाना ते आता जाणवू लागले आहेत. प्रशांत बच्छाव यांचे आजही एकत्र कुटुंब आहे. वडील, चुलते असे सर्व जण कुटुंबात आज रोजी ३५हून अधिक जण राहतात. बच्छाव कुटुंबामध्ये प्रशांत यांचे वडील सर्वांत मोठे असल्यामुळे प्रशांत हेसुद्धा सध्याच्या पिढीमध्ये मोठे आहेत. पोलिस अधिकारी होऊन त्यांनी इतर भावडांमध्ये एक आदर्श ठेवला आहे. एकत्र कुटुंबाचे नक्कीच अनेक फायदे असल्याचे प्रशांत बच्छाव सांगतात.

कष्ट करून शिक्षण…
प्रशांत बच्छाव हे एकत्र कुटुंबात वाढले असले, तर कष्ट करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. वेळप्रसंगी विहिरीवरची जडिपाची कामे केली आहेत. कष्टाशिवाय पर्याय नाही, हे लहानपणीच शिकायला मिळाल्याचा आयुष्यात मोठा फायदा झाला. प्राध्यापक तर झालेच, पण मालेगाव तालुक्यातील ते दुसरे पोलिस अधिकारी ठरले आहेत. उच्च शिक्षण घेऊन अधिकारी झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा आनंद झाला होता. शिवाय, अभिमानही वाटत आहे.

प्राध्यापक म्हणून नोकरी…
बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजला प्रवेश घेतला. बी.एस्सी, एम.एस्सी करून प्राध्यापक होण्याचे ठरवले होते. त्या दिशेने योग्य वाटचाल सुरू ठेवली. एम.एसस्सी झाल्यानंतर पुणे शहरांमध्ये विविध कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना जीवनाची घडी बसली होती. ठरवल्याप्रमाणे घडले होते. ज्ञानदानाचे काम करत असतानाच विद्यार्थी घडविण्याचा आनंद मिळत होता. विद्येच्या माहेरघरामध्ये सात वर्षे प्राध्यापक म्हणून काम करताना अनेक विद्यार्थी घडले. पण, बारावीमध्ये पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मनामध्ये ध्यास होता.

स्पर्धा परीक्षा…
प्राध्यापक म्हणून काम करत असताना दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कुटुंबीयांना अभ्यासासाठी दोन वर्षे मागितली होती. स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर निकाल हाती आला होता. पहिल्याच प्रयत्नात पीएसआयसह एलआयसी आणि असिस्टंट कमांडट अधिकारी म्हणून इतर दोन परीक्षाही उत्तीर्ण झाले. दुसरीकडे २००२ मध्ये नीटची परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाले होते. तिसऱ्यांदा परीक्षा दिल्यानंतर डीवायएसपी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि बारावीमध्ये अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. पहिले पोस्टिंग जिंतूर (परभणी) येथे डीवायएसपी म्हणून मिळाले होते. शिवाय, बी प्लॅनसुद्धा यशस्वी झाला होता.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!