
Video: दिवाळी साजरी करत असताना पाया पडले अन् काका-पुतण्याची केली हत्या…
नवी दिल्ली : दिल्ली मधील शाहदरा परिसरात गुरुवारी (ता. ३१) रात्री फटक्यांच्या आवाजात गोळीबार करून काका-पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरी दिवाळी साजरी करत असतानाच सर्वांसमोर आकाश (वय ४०) आणि त्यांचा पुतण्या ऋषभवर (वय १६) गोळीबार करण्यात आला. दुहेरी हत्याकांडाच्या य़ा घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केले आहे. आकाश हे त्यांचा मुलगा आणि पुतण्यासोबत दिवाळी साजरी करत होते. मुलं फटाके उडवत असताना स्कुटीवरून दोघे आले. त्यापैकी एक जण खाली उतरून उभा राहिला आणि दुसरा व्यक्ती स्कुटीवरच होता. आकाश हे मुलांसोबत फटाके उडवत होते तेव्हा हल्लेखोरांपैकी एकाने आकाश यांच्या पाया पडत काका रामराम म्हटले. त्यानंतर हाच आहे गोळी मार असे म्हणताच दुसऱ्याने गोळीबार केला. तेव्हा घरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकाश यांना घरात घुसून मारले.
आकाश यांच्या मुलाला सुद्धा गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. आकाश यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषभवर त्यांनी गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेत आकाश आणि त्याच्या पुतण्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी घराच्या दारातच ऐन दिवाळीच्या तोंडावर केलेल्या या हल्ल्याने सगळेच हादरले आहेत.
दरम्यान, घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. चार सीसीटीव्ही फूटेजमधून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याची माहिती समजते. हल्लेखोर हा आकाश यांच्या कुटुंबियांच्या ओळखीचाच असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Farsh Bazaar double murder cctv
A man and his cousin shot dead while celebrating Diwali. #delhimurder #DelhiPolice #Delhicrime pic.twitter.com/Z8b4iFkS3f— Shehla J (@Shehl) November 1, 2024
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…
पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…
प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

