पुण्यातील मंदार किवळे प्रकरण! मृतदेहावरच घेतली होती हत्येचा बदला घेण्याची शपथ…

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाजवळ टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय ३५) गंभीर जखमी झाला आहे. न्यायालयासमोरील रस्त्यावर बुधवारी (ता. २५) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला अन् एकच गोंधळ उडाला. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने या संपूर्ण घटनेचा कट रचला होता. त्याने इतर आरोपींना सुपारी देऊन ही घटना घडवून आणली. अक्षय चव्हाण याने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयच्या मनात मंदारविषयी प्रचंड राग होता. त्याला काहीही करून मंदारला संपवायचं होतं. त्यामुळे त्याने सहा पोरं निवडली अन् भावाच्या हत्येची बदला घेण्याचे ठरवले. भावाच्या हत्येचा बदला घेणारच अशी शपथ शुभमनच्या भावाने मृतदेहावर घेतली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर एक ते दोन दिवसांपासून आरोपींनी “ट्रॅप” लावला होता. किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर भागात जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते.

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला का मारलं…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…

पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!