सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीचा अखेर कबुलीजबाब…

मुंबईः बॉलिवुडचा आघाडीचा नायक खान सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम याने पोलिसांशी सहकार्य करून संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये शरीफुलने सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला केला होता. त्यात सैफ अली खान जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. आता त्याने पोलिसांशी सहकार्य करून, सर्व माहिती दिली आहे.

या हल्ल्याची पार्श्वभूमी अशी, की १६ जानेवारी २०२५ रोजी आरोपी शरीफुल इस्लाम शेख हा सैफ अली खानचा मुलगा तैमुर याच्या खोलीतील स्नानगृहातून आत शिरला होता. बाहेर पडल्यानंतर त्याने सैफवर चाकूने हल्ला केला होता. सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचा कसून तपास करत, आरोपी शरीफुल इस्लाम शेख याला अटक केली होती.

हल्ला केल्यानंतर शरीफुल हा बांगलादेशात पळून जाणार होता, अशी माहिती देऊन, पोलिसांनी सांगितले, की या घटनेता आता जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. तथापि, आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आरोपी शरीफुलने आपला गुन्हा कबूल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!