पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…

पुणे: पुणे शहरातील MIT ADT विद्यापीठाच्या आवारात संतापलेल्या पित्याने एका विद्यार्थ्याला लोळवून लोळवून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका युवतीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. संबंधित विद्यार्थी पीडित युवतीला गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत होता. वारंवार मेसेज, संपर्क करण्याचे प्रयत्न आणि त्रासदायक वर्तनामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

संबंधित विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आल्याचे समजताच युवतीचे वडील थेट महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडत जाब विचारला. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही क्षणांतच झटापटीत परिवर्तित झाला. संतप्त पित्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला. मात्र संतप्त पित्याला रोखण्याचे धाडस कुणी केले नाही. “मुलीला पुन्हा त्रास दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही पित्याने मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला दिला.

दरम्यान, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घडलेला हा प्रकार काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र ऑनलाईन छळाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे.

Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!