
मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या युवकाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९६ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात टोळी प्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय 22 रा. वडारवाडी, दिप बंगला चौक, पुणे), सुबोध अजित सरोदे (वय 20 रा. पांडवनगर, पुणे), ओंकार सोमनाथ हिंगाडे (वय 22 रा. पी.एम.सी कॉलनी, पांडवनगर, पुणे), अभिजीत उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय 21 रा. चाफेकर नगर, शिवाजीनगर, पुणे), अयाज रईस उर्फ रईसुद्दीन इनामदार (वय-19 रा. जनवाडी, पुणे), कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे (रा. गोखलेनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 364अ, 324, 323, 504, 506/2, 141, 143, 147, 149, सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलिस कायदा (Maharashtra Police Act) कलम 135, 37/1 नुसार गुन्हा दाखल केला असून, ओंकार हिंगाडे याला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान शेती महामंडळ चौक व जनकवाडी परिसरात घडला होता.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (अति. कार्यभार), अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त परी – ४ पुणे शहर, शशीकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण व जगन्नाथ जानकर, सहा. पोलिस निरीक्षक अनिल केकाण, निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमंलदार अमित गद्रे, सुहास पवार, दत्तात्रय रेड्डी यांनी केली आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ९६वी कारवाई आहे.

मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…
मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…
मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

