हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…

पुणे: पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस कवायत मैदानावर ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात पोलिस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होती. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथून पुरुषोत्तम या चाचणीसाठी पुण्यात आला होता. भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा १६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तो सहभागी झाला होता. पुरुषोत्तमने पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण उत्साहाने आणि जिद्दीने पार केल्या. मात्र, तिसरी फेरी धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. धावता धावता त्याला तीव्र झटका आला. तो जागीच ट्रॅकवर कोसळला. मैदानावरील उपस्थित पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने त्याला तत्काळ प्रथमोपचार देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पुरुषोत्तमची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाघाताने आजारी असून, ते अंथरुणाला खिळलेले आहेत. घरात आई आणि दोन बहिणींच्या विवाहाची तसेच संपूर्ण उदरनिर्वाहाची जबाबदारी पुरुषोत्तमच्या खांद्यावर होती. सरकारी नोकरी मिळवून वडिलांचे उपचार आणि घराला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. तो एक शांत, संयमी आणि कष्टाळू तरुण म्हणून गावात परिचित होता.

पुरुषोत्तमच्या निधनाची बातमी चिंचोली बुरकुल गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याने पोलिस भरतीसाठी अत्यंत मेहनत घेतली होती. मात्री नशिबाने त्याला साथ दिली नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत.

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…

महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…

राज्यात पोलिस भरतीला सुरुवात; अर्जदारांची संख्या मोठी…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; घ्या अधिक माहिती जाणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!