सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…

जळगाव: प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने आज (बुधवार) पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कापडे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

प्रकाश कापडे (३९) हे गेल्या १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दलाच्या सेवेत होते. त्यांनी याआधी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर येथील गणपतीनगर भागातील आपल्या निवासस्थानी परतले होते. आज पहाटे निवासस्थानीच कापडे यांनी स्वतःच्या आत्मसंरक्षण बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकताच घरात झोपलेल्या कुटुंबियांनी कापडे यांच्या खोलीकडे धाव घेतली, त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. ते दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. मात्र, त्यातून सावरत त्यांनी जामनेर येथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत कापडे यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

कापडे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर, तसेच तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत कापडे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. घटनेनंतर कापडे यांच्या निवासस्थानाबाहेर परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. कापडे हे गोरेगाव (मुंबई) येथे राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!