राष्ट्रवादी काँग्रेसच्या ZP सदस्याला अटक; सरकारलाच गंडवले…

पालघर : खासदाराची बानवट सही करून सरकारचा दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हबीब शेख यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर गावित यांची बनावट सही करून सरकारची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाड्यातील आसे जिल्हा परिषद गटातील हबीब शेख हे सदस्य आहेत. खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून शनिवारी (ता. १९) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने हबीब शेख यांना अटक केली .

मोखाडा विभागातील मोखाडा खडाळा विहिगाव राज्य मार्ग 78 या रस्त्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी शासनाकडून दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने मंजुरी देखील दिली. मात्र पाठपुरावा करताना या आधीच खासदारांच्या लेटर पॅड आणि त्यांच्या सहीचे पत्र शासनाकडे जमा झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगताच ही कागदपत्र आणि या कागदपत्रांवरील आपली सही बनावट असल्याच सांगत खासदार गावित यांनी पोलिसात धाव घेतली. खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खासदारांच्या नावेच अशी बनावट कागदपत्र सादर केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हबीब शेख हे पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…

थरार! दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी केले सपासप वार…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…

पुणे शहरातून चोरलेल्या थार मोटार चोरांना पाठलाग करून पकडले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!