
आईचा निर्दयीपणा! मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, छातीवर चावली; कारण…
डेहराडून (उत्तराखंड): हरिद्वार येथील झबरेडामध्ये राहणारी एक महिला आपल्या 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबत असून, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिलेने मुलाला हाताने ठोसे मारले आणि त्याच्या छातीचा चावा घेतला. ही अमानूष मारहाण होताना मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण, त्याच्या आईने क्रौर्याची परिसीमा ओलांडली. विशेष म्हणजे या महिलेने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि विभक्त राहणाऱ्या पतीला पाठवला आहे.
उत्तराखंड पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे दोन महिन्यांपूर्वीचा आहे. या महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला मारहाण करत हा व्हिडिओ बनवला होता आणि पतीला पाठवला होता. पतीने व्हिडिओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. संबंधित महिलेचा पतीसोबत गेल्या 10 वर्षांपासून वाद सुरू आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
महिलेने तपासादरम्यान सांगितले की, ‘ती एका दुकानात काम करून आपला खर्च भागवते. पतीला घाबरवण्यासाठी आणि त्याला घरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने तिने हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओमध्ये मुलाला मारताना आणि चावताना दिसत असलं तरी त्याला दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली होती. नवरा देवबंद सहारनपूरमध्ये एका कापडाच्या दुकानात काम करतो. तो घरखर्चासाठी पैसे देत नाही आणि व्यसनही करतो.’ महिलेने आपल्या पतीला घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण, नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
क्या दुनिया में माँ ऐसी भी होती हैं?
रूह कंपा देने वाली वीडियो 😡😡90 KG की महिला अपने छोटे 25 KG बेटे के ऊपर बैठकर उसे मुक्कों, दांतों सर पटकना गाला दबाना !!
एक मासूम छोटा बच्चा वहीं पर खड़ा देख रहा!
अगर ये सच है तो इसको जल्द गिरफ्तार करे !! #viralvideo #up #uttrakhand pic.twitter.com/NCZzsihfCw— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) July 17, 2024
दरम्यान, मुलाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरिद्वार पोलिसांनी चाइल्ड केअर हेल्पलाइनला माहिती दिली. महिलेला बोलावून रोशनाबाद येथील चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर (सीडब्ल्यूसी) हजर केले. तिथे महिला आणि तिच्या मुलाचे समुपदेशन करण्यात आले. सीडब्ल्यूसी अनेक टप्प्यांत या महिलेचे समुपदेशन करणार आहे.
हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…
संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…
भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…
बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…
धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

