पती-पत्नीचा खाजगी व्हिडिओ मित्राला मिळाला अन् त्याने पुढे…
मुंबई : एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीसोबतचा खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याच एका जवळच्या मित्राला अटक केली आहे. मित्राने अश्लील व्हिडीओ तर व्हायरल केला असून, ब्लॅकमेल करून 50 हजार रुपये घेतल्याचाही आरोप महिलेने केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जोशुआ फ्रान्सिस असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पीडित महिला आणि तिच्या पतीचा जवळचा मित्र आहे. महिलेचा पती दारू पिऊन धिंगाणा घालायचा, अनेकदा पत्नीशी भांडायचा. एक दिवस दारूच्या नशेतच महिलेच्या पतीने तिच्यासोबतच्या शारिरीक संबंधांचा व्हिडीओ बनवला. यानंतर महिलेच्या पतीनेच हा व्हिडीओ मित्र फ्रान्सिसला दिला. फ्रान्सिसने संबंधित व्हिडीओ एका अश्लिल साईटवर अपलोड केला.
अश्लिल साईटवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर फ्रान्सिसनं महिलेला फोन करून याबाबत माहिती दिताना म्हणाला, एक मित्र विकास हा सायबर एक्सपर्ट आहे. तो अश्लील व्हिडीओ हटवू शकतो. पुढे महिलेच्याच मित्रानं विकास म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केला. त्याने महिलेला सांगितलं की, तो वेबसाईटवरुन कंटेंट डिलीट करू शकतो, पण, त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील. पीडित महिला पैसे देण्यासाठी तयार झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिचा व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. त्यानंतर महिलेनं पोलिसांशी संपर्क करुन या प्रकरणात आरोपीच्या विरोधात आपली तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी फ्रान्सिसला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…
युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…