पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; तीन जणांचा मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज (बुधवार) सकाळी पावणेसातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर हा अपघात झाला आहे.

एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था यामध्ये जो निर्मनुष्य परिसर आहे, तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले.

हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलिस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला. मात्र, येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. त्यांना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे. पुणे-बंगळुरु महामार्गही येथून काही अंतरावरच आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

दरम्यान, मुळशीचा हा परिसर डोंगराळ असून, डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुके आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे. परिसर नैसर्गिक सौदर्यांने नटलेला असल्यामुळे या परिसरात अनेक रिसॉर्टस आहेत. यापैकी ऑक्सफर्ड काउंटी हे अलिशान रिसॉर्ट हे प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्ती येत असतात. या व्यक्तींना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू…

Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!