आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…

सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. मृतदेहाजवळच मृताची दुचाकी आढळून आली होती. हल्लेखोरांनी दगडाने कामगाराला ठेचल्यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

याबाबत शहर पोलिस ठाण्यास माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघांना न्यायालयासमोर आज (शुक्रवार) हजर केले जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…

वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!