अभिमानास्पद! पोलिसकाकाचा मुलगा झाला ‘साहेब’!

पुणे: पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेत देशात 359वी रँक घेऊन यशस्वी झाला आहे. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच नाव आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर (थिटेवाडी) येथील अतिशय सर्वसामान्य घरातील शुभम थिटे या विद्यार्थ्याने आपल्या कठीण परिश्रम, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यूपीएससी सारखी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश संपादित केले आहे. पाच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर शुभम थिटे याला यूपीएससी परीक्षेत यश मिळाल आहे. फक्त सेल्फ स्टडी करून शुभम थिटेने यूपीएससी सारख्या अवघड परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. लहानपणापासून अभ्यासात कुशाग्र असलेल्या शुभमच्या या यशामुळे त्याचे कुटुंब आनंदाने भारावले आहे. विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाच्या वर्षाव होत आहे.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत, यापैकी महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळवले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे पहिला आला आहे. देशात समीरने 42 वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!