
रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार हे १९९२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलातील ३१ वर्षांचा असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पोलिस दलात काम करत असताना अतिशय शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम पाहिले आहे. सांगली, लातूर, नांदेड येथे पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त, राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पुणे शहराचे पोलिस आयुक्त म्हणून २०२२ रोजी सूत्रे स्वीकारली असून, पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेलाच त्यांनी प्राधान्य दिले आहे.
पुणे शहरचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआयडीचे प्रमुख होते. सीआयडीचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी सीआयडी विभागात कर्तव्य बजावत असताना विविध गुन्हे उघड केले. पुणे शहरातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. बिनतारी संदेश विभागाचे अत्याधुनिकरण करण्याबरोबर देशपातळीवर सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान वापर अशी दोन पारितोषिके मिळवून देण्यात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
डिजिटल दळवणळण प्रणाली, उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा व डिजिटल रेडिओ ट्रॅकिंग प्रणाली अशा सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र पोलिस दलाकडून केला जातो. तंत्रज्ञानातील बदलाच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरची निर्मिती बिनतारी संदेश विभागाने केली आहे. विभागातील जे. सी. बोस ई-लर्निंग सेंटर, डिजिटल क्लासरूममध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व इतर राज्यातील पोलिस दलातील २५० पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राज्य बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयामध्ये आर्यभट्ट हे खुले संग्रहालयही रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे.
रितेश कुमार यांनी सीआयडीमध्ये असताना गुन्हे निर्गती वेगवान होण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रात CCTNS/ ICJS ही प्रणाली त्यांनी यशस्वीपणे राबविली आहे. त्यासाठी देश पातळीवर त्यांचा आणि सीआयडीमधील इतर अधिकार्यांचा केंद्र सरकारकडून गौरवदेखील करण्यात आला होता. पुण्यात झालेल्या DGP/IGP कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या कॉन्फरन्सच्या आयोजनात रितेश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा होता. २००८ मध्ये पोलिस महासंचालक, २०१० मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक आणि २०२० मध्ये विशिष्ट उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे.
पुणे शहराचे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी हाती घेतल्यानंतर शहरातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’, ‘पोलिस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबवत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. पोलिस चौक्या २४ बाय ७ दिवस सुरू करण्याबरोबरच सीसीटीव्हीने जोडल्या गेल्या. दामिनी पथकाची संख्या १५ वरून ४० पर्यंत तर सीआर मोबाईल ३२ पर्यंत वाढविल्या. बीट मार्शलची संख्या जवळपास दुप्पट केली. दररोज पायी पेट्रोलिंग सुरू केल्यामुळे पोलिस रस्त्यावर दिसू लागले, शिवाय दररोज नाकाबंदी सुरू केली. १००हून अधिक गुंड टोळ्यांवर मोक्का, ७५हून अधिक एमपीडीएअंतर्गत कारवाई केली. पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य देत असतानाच ते आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेतात. शांत, संयमी आणि नम्र असलेले रितेश कुमार यांच्याशी केलेली बातचीत…
बालपण कसे आणि कुठे गेले?
रितेश कुमार : बिहार राज्यातील गया आणि पाटणा येथे बालपण गेले. उच्चशिक्षित कुटुंब आणि सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे लहानपणापासूनच शिस्त आणि अभ्यासाची गोडी लागली होती.
शाळा ते पुढील शिक्षण कसे आणि कोठे झाले?
रितेश कुमार : दहावीपर्यंतचे शिक्षण बिहार आणि झारखंडमधील सैनिक स्कूलमध्ये झाले. दहावीनंतर पुढील शिक्षण दिल्ली येथील करोडीमल कॉलेजमध्ये झाले. शिवाय, एलएलबीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम दिल्ली येथेच पूर्ण केला आहे.
कुटुंबाची परिस्थिती कशी होती?
रितेश कुमार : कुटुंबातील सर्व जण उच्चशिक्षित आहेत. आई-वडील दोघेही शिक्षण क्षेत्रात काम करत होते. कुटुंबाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे उच्च शिक्षणाला वाव मिळाला.
पोलिस दलात कुटुंबातील कोणी होते का?
रितेश कुमार : कुटुंबामधील पोलिस दलात कोणी नव्हते. पण, सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे खाकी वर्दीची आवड निर्माण झाली होती. यूपीएससीची परीक्षा देऊन पोलिस दलात यायचे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते पूर्ण झाले.
यूपीएससी परीक्षा कोणत्या वर्षी परीक्षा दिली?
रितेश कुमार : शिक्षण घेत असतानाच पुढे काय करायचे आहे, हे ठरलेले होते. यूपीएससीचा घरच्या घरी अभ्यास सुरू केला. कोणताही क्लास न लावता १९९१मध्ये परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच पास झालो.
पोलिस दलात किती वर्षांपासून आहात?
रितेश कुमार : १९९२ च्या तुकडीचा IPS अधिकारी आहे. कोल्हापूर, लातूर, सांगली, एसआरपीएफ, मुंबई, नांदेड, पोलिस अॅकॅडमी, औरंगाबाद, राज्यपाल कार्यालय आणि सीआयडीमध्ये काम केले आहे. सध्या पुणे शहरचे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.
कुटुंब आणि पोलिस खाते बॅलन्स कसे राखता?
रितेश कुमार : नोकरीबरोबरच कुटुंबही तेवढेच महत्त्वाचे आहे. दोन्ही पातळ्यांवर वेळ देणे महत्त्वाचे असते. आयुष्यामध्ये बॅलन्स हा महत्त्वाचा असून, तो साधला तरच ध्येय गाठता येते. शिवाय, कुटुंब आनंदी असेल, तर नोकरीमध्ये मन लावून काम करता येते.
आरोग्याची काळजी कशी घेता?
रितेश कुमार : प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य सदृढ असेल तर सर्व काही व्यवस्थित असते. शाकाहारी असल्यामुळे हेल्दी फूड, घरगुती आणि वेळेवर जेवण घेतो. सकाळी चालण्याबरोबरच योगा केल्यामुळे मन प्रसन्न राहते.
पोलिस खात्यातील ताणतणाव कसा दूर करता?
रितेश कुमार : लहापणापासूनच प्राणायम, योगा आणि मेडिटेशन करत आहे. सकाळी-सकाळी बागेमध्ये फिरण्याबरोबरच काम करण्याची आवड आहे. क्लासिकल संगीत ऐकण्याची आवड आहे. संगीत ऐकल्यामुळे मन प्रसन्न होत असल्यामुळे कामाचा कितीही ताणतणाव असला तरी तो दूर जाण्यास मदत होते.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी काय सल्ला द्याल?
रितेश कुमार : आरोग्याकडे लक्ष द्या, वेळवर जेवण घेण्याचा प्रयत्न करा, शक्यतो बाहेरचे जेवण टाळा, हेल्दी फूड घ्या, घरच्या घरी किमान अर्धा तास व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा.
– संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन : लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

