पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…

पुणे : प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतल्याची धक्कादायक घटना खेडमध्ये घडली आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले आहे. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचे बिंग फुटले.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. आई बसरिन मेहबूब शेख (वय २७) हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात तिचा मुलगा आवेज मेहबूब शेख (वय ६) हा अडथळा ठरत होता. म्हणून 4 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास आईने प्रियकराच्या मदतीने आवेजचा जीव घेतला. बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून नंतर डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपींनी हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यासाठी आई आवेजचा मृतदेह माहेरी म्हणजे बीडला घेऊन गेली. हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असे सांगून अंत्यविधी करण्याचे तिने ठरवले. आईच्या वडिलांनी पतीच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी बोलवले. त्यावेळी आवेजच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली आणि शवविच्छेदन अहवालात आईचे आणि प्रियकराचे बिंग फुटले.

दरम्यान, बसरीन आणि मेहबूब यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना तीन मुलं आहेत. बसरीन ही गावातील पतीचे मित्र रामच्या संपर्कात आली. बसरीन पती पासून दुरावली. दोन मुलं पतीसोबत राहत होती तर बसरीनसोबत आवेज राहत होता. बसरीन पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरळीत एकत्र राहत होते. मात्र मुलगा अडसर ठरेल म्हणून या दोघांनी त्याचा जीव घेतला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बसरीन हिला बेड्या ठोकल्यात असून, तिचा प्रियकर फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

हृदयद्रावक! आईने पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं चिमुकल्याला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!