
बारामती! भावकीच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या…
बारामती (पुणे): बारामती तालुक्यातील पारवडीमध्ये बुधवारी (ता. १०) रात्री भावकीच्या वादातून युवकाची (वय २४) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण तालुका पोलिस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते. या दरम्यान सौरभला बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाथरूम माझ्या जागेत बांधले असा सौरभचा दावा होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळे याने प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे भांडणात रुपांतर झाले. या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केल्याने सौरभच्या चुलत भावांनी सौरभला बारामती येथील दवाखान्यात दाखल केले होते. दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण बारामती तालुका पोलिस ठाण्यात आले होते आणि त्यांनी सौरभ विरोधात फिर्याद दिली आहे.
या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती सौरभने पोलिसांना दिली होती. बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे या बापलेकाला ताब्यात घेतले. पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.
सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…
पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…
उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
बारामती! युवकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेत आली पहिली…
बारामती पुन्हा हादरली! युवकाचा कोयत्याने वार करून खून…

