नमो हॉस्पिटल तर्फे पोलिसकाकांची मोफत आरोग्य तपासणी…
पुणे (योगेश काळे): नमो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नितीन चोरडिया यांच्या सह गौतमलब्धि फाउंडेशन, शांतिनगर, जेएसजी क्रिस्टल या संस्थाच्या मदतीने कोंढवा पोलिस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ६० पेक्षा अधिक पोलिस बांधवांनी सहभाग नोंदवला.
पुणे शहरामध्ये वेगवेगळे सण-उत्सव उत्साहाने साजरे केले जातात, अशा वेळी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवताना पोलिस बांधवांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नमो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व इतर संस्थांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाहुराजे साळवे (सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग) व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी नमो हॉस्पिटलचे संचालक डॉ सागर लोढा, डॉ. मनिष कोलगे, डॉ. योगेश भुरट, डॉ. योगेश सोमवंशी, नितिन चोरडिया यांचे आभार मानले व सन्मान केला.
सर्व सहयोगी संस्थांचे पदाधिकारी, दिलीप कटारिया, सेजल कटारिया, गोकुळ रुणवाल, डॉ. अंकिता लोढा, वर्षा ओस्तवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आला ‘आरोग्यवती भव’ उपक्रम!
Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…