
मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…
पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस ठाणे बिट मार्शलच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पोलिसांनी दाखविलेली तत्परता व मानुसकीचे नागरिकांकडून मोठया प्रमाणात कौतुक होत आहे.
मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील घोरपडी बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार प्रविण होळकर व जगदीश महानवर यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून डायल – ११२ द्वारे रात्रौ १०.०० वा. दरम्यान निगडेनगर, लेन-७, फ्लॅट नं. २८, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे येथे कॉलर विजय भाऊ पासलकर (वय ३६) हे आत्महत्या करीत असल्याचा पोलिस मदतीचा कॉल प्राप्त झाला. तात्काळ घोरपडी बिट मार्शल अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून आत्महत्या करीत असलेल्या विजय पासलकर यास ताब्यात घेवून घोरपडी पोलिस चौकीस घेवून आले. चौकी अंमलदार सहा. पोलिस फौजदार रासकर यांनी त्यास आधार देवून, समजावून सांगून शांत केले.
कॉलर विजय पासलकर याचेकडे आत्महत्या करण्याचे कारणचे अनुषंगाने विचारपुस केली असता, घरगुती कौटूंबिक प्रॉपट्री वाद चालू असल्याने मला खुप त्रास होत आहे म्हणून मला आत्महत्या करणे सोडून दुसरा पर्याय नाही असे सांगितले. सदर कॉलची माहिती पोलिस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉलर विजय पासलकर याचे नातेवाईकांना संपर्क करुन पोलिस चौकीस बोलावून त्यांचे वाद-विवादाचे अनुषंगाने चर्चा करुन कॉलर यांचे तक्रारीचे निरासन करणे बाबत सांगितले असता, त्याप्रमाणे विजय पासलकर यांचे नातेवाईकास संपर्क करुन त्यांना सदर बाबत माहिती देवून समजावून सांगितले, तेव्हा कॉलर विजय पासलकर यांचे समाधान झाले. कॉलर यांचे आत्महत्येपासून मन परिवर्तन झाल्याने आत्महत्या करणार असल्याचे सांगुन तसा स्वखुशीने जबाब लिहून दिला आहे.
कॉलर विजय पासलकर यास तत्परतेने वेळेत पोलिस मदत करुन योग्य सहकार्य व समुपदेशन केल्याने कॉलर यांचे आत्महत्या करण्यापासुन मन परिवर्तन केले. पोलिसांनी दाखविलेली तत्परता व मानुसकीचे नागरिकांकडून मोठया प्रमाणात कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांचे सुचनाप्रमाणे सहा. पोलिस फौजदार, रासकर, पोलिस अंमलदार प्रविण होळकर, जगदीश महानवर यांनी केली आहे.
Video: खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…
Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!
मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…
मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…
मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

