मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजमजेकरीता वाहन चोरी करणा-या चोरटयास मुंढवा पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

तक्रारदार भागिराज शंकरअय्या मुंडलापाटी (वय २४ वर्षे धंदा इंव्हेंट मॅनेजमेंट रा. पीसीबी क्वार्टर्स घर नं १२ घोरपडी पोलिस चौकी पाठीमागे घोरपडी पुणे) यांनी त्यांचे मालकीची हीरो होंडा मोटार स्प्लेंडर प्लस आरटीओ नं एमएच १२ एमएन ९३२३ गाडी ही त्यांनी मुंढवा हददीतील बीटी कवडे रोडवरील असलेल्या युनिवर्सल फिटनेस क्लब या जीम बाहेर पार्क करुन ठेवलेली होती. सदरचे वाहन हे त्या ठिकाणावरुन अज्ञाताने चोरुन नेले होते. त्याबाबत मुंढवा पोलिस ठाणेस गुर नं ४१ / २०२४ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा ०२/०२/२०२४ रोजी दाखल झालेला होता.

सदर गुन्हयाचे तपासाबाबत मुंढवा पोलिस ठाणेचे वपोनी महेश बोळकोटगी यांनी तपास पथकास आदेश दिलेने मुंढवा तपास पथक सदर वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पो. शि ८२०८ हेमंत पेरणे यांना त्यांचे गोपनीय बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण चोरीची गाडी घेवुन बीटी कवडे ब्रीज खाली संशयित रीत्या थांबलेला आहे. सदरची बातमीवरुन वपोनी श्री मुंढवा पोलिस ठाणे यांनी कारवाईचे आदेश दिलेने तपास पथक अधिकारी सपोनी संदीप जोरे व स्टाफ यांनी सदर वाहनचालकास ताब्यात घेवुन त्याला वापरत असलेल्या गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवुन नंतर सदरची गाडी स्वताच्या फायदयाकरीता चोरल्याचे कबुल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इमरान सिकंदर शेख (वय ३४ वर्षे रा भाग्यश्री नगर घोरपडी पुणे) असे आहे. आरोपीकडे अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, आर. राजा पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.

मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…

मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…

मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…

मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!